छात्र प्रबोधन विषयी

महाराष्ट्रभरातील कुमारवयीन विद्यार्थ्यांसाठी मासिक सुरु करावे, ज्ञान प्रबोधिनीचे संस्थापक डॉ. आप्पा पेंडसे यांचे स्वप्न होते. केवळ मनोरंजन व माहिती पुरवणे हा या मासिकाचा हेतू नसून त्यातून व्यक्तिमत्त्व विकसनाच्या प्रेरणेचे स्त्रोत निर्माण व्हावे अशी त्यांची कल्पना होती. २०२३ पर्यंत ३१ वर्षांचा यशस्वी प्रवास करत छात्र प्रबोधनच्या रुपात हे स्वप्न सत्यात आले.